< >
मला तुझी बिंदीच जास्त आवडते
कारण ती नसताना तू...
तू वाटत नाहीस ........
*****
पहाटेच्या धुक्यावर
मी लिहिलं तुझं नाव..
तुझी आठवण तुझा ध्यास
माझं अवघं भरून राहिल गाव......
तुझ्या वाचून जगणे
जगणे वाटत नाही
कधी मित्रांसमवेत हसलो तर
ते हसणे हसणे वाटत नाही
प्रीतीचे नाव कोरून
मी जपून ठेवलंय नातं
तुझं तुलाच चोरून
अशी झुरते कविता
सांभाळून प्रीतीचे धागे
किती काळ लोटून गेला
असं कोण राहिलं मागे
तुझे कुंतल की
माळलीस रात्र वादळातली
डोळेही बेहोष
जणू रातनक्षी आभाळातली
*****
मला माहीत आहे मला पाहिल्यावर
तुझ्यात संचारते वादळ
मलाही घायाळ करते
मोहक तुझी नजर
*****
ढग दाटून आल्यावर
आभाळ सांडत राहिले
मला भिजायचं होतं नखशीकांत
पण मन तुला शोधत राहिले
*****
अगं अगं सावर
तुझा रेशमी पदर
बघ निसटून चाललाय
माझ्या मनाचा भ्रमर
*****
तुझे कात्थई डोळे
नेह्नी मला शोधत असतात
नजरभेट झाली कि मात्र
खाली झुकत असतात
*****
कधी काही माझं एकटेपण
तुझ्याहुनही प्रिय वाटतं
तू नसताना ते माझ्याशी
हितगुज साधतं
*****
तुजसाठी कधीपासून मी
चंद्र एक सांभाळलेला
तुझ्या पाऊलखुणा शोधत
अजून सुरंगीच्या पानात हरवलेला
*****
तू डोळ्याआड होताना
माझं मलाही कळलं होतं
मनातल्या पिंपळाचं
पान - नं - पान गळालं होतं
कितीही अडवलं तरी
तुझ्या तळहातावर गुंतलेलं
या काळोख्या वाटेवर
माझा एकट्याचाच प्रकाश
माहित नाही काजव्यांचा प्रकाश
कुठवर देईल साथ
तुझी शल्ये तुझ्या वेदना
तू माझी The Collection
राजेश शिरवाडकर
💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗
तुझ्या गालावरच्या लाली पेक्षा
कारण ती नसताना तू...
तू वाटत नाहीस ........
*****
मी लिहिलं तुझं नाव..
तुझी आठवण तुझा ध्यास
माझं अवघं भरून राहिल गाव......
*****
होता मन गुलमोहर
घेऊन आलीस रंग लाल
कधी कविता तू कधी फुलराणी
शिंपित मनी गुलाल
*****
जगणे वाटत नाही
कधी मित्रांसमवेत हसलो तर
ते हसणे हसणे वाटत नाही
*****
तुझ्या प्रत्तेक शब्दावरप्रीतीचे नाव कोरून
मी जपून ठेवलंय नातं
तुझं तुलाच चोरून
*****
अशी झुरते कविता
सांभाळून प्रीतीचे धागे
किती काळ लोटून गेला
असं कोण राहिलं मागे
*****
माळलीस रात्र वादळातली
डोळेही बेहोष
जणू रातनक्षी आभाळातली
*****
मला माहीत आहे मला पाहिल्यावर
तुझ्यात संचारते वादळ
मलाही घायाळ करते
मोहक तुझी नजर
*****
ढग दाटून आल्यावर
आभाळ सांडत राहिले
मला भिजायचं होतं नखशीकांत
पण मन तुला शोधत राहिले
*****
अगं अगं सावर
तुझा रेशमी पदर
बघ निसटून चाललाय
माझ्या मनाचा भ्रमर
*****
तुझे कात्थई डोळे
नेह्नी मला शोधत असतात
नजरभेट झाली कि मात्र
खाली झुकत असतात
*****
कधी काही माझं एकटेपण
तुझ्याहुनही प्रिय वाटतं
तू नसताना ते माझ्याशी
हितगुज साधतं
*****
तुजसाठी कधीपासून मी
चंद्र एक सांभाळलेला
तुझ्या पाऊलखुणा शोधत
अजून सुरंगीच्या पानात हरवलेला
*****
तू डोळ्याआड होताना
माझं मलाही कळलं होतं
मनातल्या पिंपळाचं
पान - नं - पान गळालं होतं
*****
तुझ्या मेहंदीच्या रेषांत
माझं मन रंगलेलं तुझ्या मेहंदीच्या रेषांत
कितीही अडवलं तरी
तुझ्या तळहातावर गुंतलेलं
*****
तुझी स्वप्नं पाहताना
जवळ किती आठवणी
तू माझ्यापासून किती दूर
जशी दुरस्त चांदणी
*****
या काळोख्या वाटेवर
माझा एकट्याचाच प्रकाश
माहित नाही काजव्यांचा प्रकाश
कुठवर देईल साथ
*****
आता माहित नाही काळ
दाखवील कोणती वाट
मी बांधली पण
तुझ्या हृदयाशी गाठ
*****
मला नुसताच घर
नाही बांधायचय
तुला बरोबर घेऊन
त्याला घरपण द्यायचय
*****
तू नसताना मी
गर्दीतही एकटाच असतो
तू सोबत असलीस कि
मी गर्दीसाठी पोरका असतो.
*****
फुले वेचली नाहीत म्हणून
प्राजक्त रागावलेला
त्याला काय माहित
मनातला प्राजक्त आधीच बहरलेला
*****
तुझ्या सहवासातले चार क्षण
मला समाधान लाख जन्माचं
आता नाही म्हणणार कधी
काहीतरी राहीलं जगण्याचं
*****
मी एकटाच होतो
पाण्यापारी बेरंग
तुला भेटलो तुझ्यात मिसळलो
जीवनात आले रंग रंग
*****
जळायचच होतं तर
का मागितली तुझी साथ
एकट्यानेच जळालो असतो तर
कोणालाच आली नसती जाग
*****
वादळ आलं तरी
सारंच उध्वस्त करत नसतं
छोट्या छोट्या वेलींना
बहरण्यासाठी मागे ठेवत असतं
*****
लिहायला तुझा विषय काढला
कि शब्द कुठून कुठून धावत येतात
मी आधी कि तू आधी करत
एकाच गर्दी करतात
*****
तुझी शल्ये तुझ्या वेदना
मी मुक्याने साहतो आहे
तुझ्या यज्ञात समिधा होऊन
रोज नव्याने जळतो आहे.
*****
तुमच्याशी बोलायला शब्दच
नाही मिळती
माझ्या शब्दांचे शब्दकोश
फक्त तिच्यासाठी
*****
कुणाकुणाला कशाकशाचा
फिवर
तू मात्र होऊन बसलीस
माझ्या मनाचा स्क्रीनसेवर
*****
तसं खूप काही असतं
तुझ्या संगे बोलायचं
तू आलीस कि राहूनच जातं
खूप काही सांगायचं
*****
शोधताना हृदय रमते
कोणासंगे हळदी उन्हात
दिसतेस फक्त तू
हिंडताना मनात
*****
तुला पाहिल्यावर ठरवलं
मनाला आवरायचं
मन दूर उभं राहून म्हणालं
तू हि ये आता नाही सावरायचं
*****
तुझ्या स्वप्नात येण्यासाठी
का शोधू बहाणा
तू तर आहेस माझा
छानसा उखाणा
*****
प्रीत नसते कधी
शब्दात मांडायची
ही गाठ अशी कि
मनाने सोडवायची
*****
इतकी वर्ष जीव फक्त
तुझ्यासाठी तरुन धरला होता
जिथे प्राण गेला तो
तुझ्या घरचा रस्ता होता
*****
Nice 😃
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteVery nice Raj! Keep it up!
ReplyDelete